(Baramati Crime) बारामती : सुपे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानक परिसरातून तब्बल साडे सात लाख रुपये असलेले इंडी कॅश कंपनीचे पैशांचे एटीएम मशीन (atm)अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. शुक्रवारी (ता. १०) पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे.
इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविले…
मिळालेल्या माहितीनुसार, बस स्थानक परिसरात इंडी कॅश कंपनीचे एटीएम सेंटर आहे. रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांनी पाहिले असता सेंटर चालू होते अज्ञात चोरट्यांनी पहाटे मशीनच उचलून वाहनात भरून पळवून नेले. चालू वाहनातच मशीन फोडले याचे काही तुकडे सुमारे सात किलोमीटर अंतरावरील नारळी गावच्या हद्दीत सापडले आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावरील (pune solapur highway) रावणगाव गावच्या हद्दीत मशीनची तिजोरीचा भाग पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मशीनमध्ये सुमारे साडेसात लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळाची उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी पाहणी केली असून तांत्रिक माहितीच्या आधारे शोधकार्य सुरु आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
चोरी झालेला मोबाईल चक्क कुरिअरने तामिळनाडूतून थेट बारामतीत ; पुणे सायबर पोलिसांची आयडिया यशस्वी
बारामतीत अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी रस्ता रोको..!!!
बारामतीच्या जावयाने मेव्हणीला नेले पळवून, सासऱ्याची थेट दौंड पोलीस ठाण्यात तक्रार..!