उरुळी कांचन, (पुणे) : (Pune Crime News) पुण्यासह नगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीच्या (Inter-district bike-stealing gang jailed) मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या मोठ्या कामगिरीत चोरीला गेलेल्या १० लाख रुपयांच्या ( worth 10 lakhs) २९ दुचाकी जप्त (29 motorcycles seized) करत ९ जणांना अटक (9 people handcuffed) करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
अमोल नवनाथ मधे (रा. वाघवाडी पोखरी ता पारनेर), विजय संजय मधे रा. निमदरी ता. पारनेर), संतोष उमेश मधे, संदिप सुभाष मधे, रा. दोघेही केळेवाडी पोखरी पवळदरा ता. पारनेर) विकास साहेबराव मधे, (रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी ता पारनेर) विजय विठ्ठल जाधव (रा. कुरकुडी ता. संगमनेर) सुनील वामन मेंगाळ रा. धरणमळई वाडी बोटा ता संगमनेर) भारत पोपट मेंगाळ रा. गारोळे पठार ता संगमनेर) मयुर गंगाराम मेंगाळ (रा. आंबीदुमाला ता संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर मोटारसायकल चोरीच्या घटनेची माहिती देऊन तपास पथकाला योग्य मार्गदर्शन तसेच तपास कौशल्य सांगून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथक जिल्ह्यात गस्त घालीत असताना सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले या पथकाला मोटार सायकल चोरी करणारे आंतर जिल्हा टोळीची गोपनीय माहिती मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने एक पथक तपासात तयार करण्यात आले. दोन्ही तपास पथकाने अहमदनगर जिल्हयातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन म्होरक्यांसह नऊ जणांना जांबुत फाटा परीसरातून ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मोटार सायकल चोरीचे व घरफोडी चोरीचे असे एकूण २६ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १० लाख रुपयांच्या २९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश थिंगळे, राजू मोमीण, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, संदिप वारे, अक्षय नवले, मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली आहे.