बारामती, (पुणे) : Baramati News : बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथील भारतातील पहिले देशी गोवंश ( Cattle) सुधारणा प्रकल्प (Project and Embryo) (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट-पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र) सोबतच एम्ब्रियो ट्रान्सफर (IVF) प्रयोग शाळेचे उद्घाटन शनिवारी (ता. ११) करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांचे हस्ते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार, विरोधीपक्ष नेते अजित दादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोणत्याही व्यवसायाचे प्रशिक्षण ते फक्त प्रशिक्षण वर्गात घेऊन चालणार नाही त्यासोबतच प्रात्यक्षिक पाहणी हे सुद्धा महत्त्वाचे आहे. असे दूर दृष्टीकोन ठेवून प्रकल्प उभारणी करताना विचार केलेला आहे. या प्रकल्पामध्ये संशोधना व्यतिरिक्त प्रशिक्षण देखील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प म्हणजे जनावरांचा आधुनिक गोठा आणि संशोधन संस्था इतक्या पुरताच मर्यादित नाही, या प्रकल्पात दुग्ध व्यवसायिकांना जनावरांच्या खरेदी पासून ते दुग्ध प्रक्रिया पर्यंतच्या सर्व बाबीवर निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वैश्विक दर्जाचे अध्ययावत असे प्रशिक्षण वर्ग त्यासोबत त्याला लागणारी इतर उपकरणे या प्रकल्पात उपलब्ध आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष जनावरांसोबत विविध कामे करण्याची त्याचबरोबर मशीनरी हाताळण्याची संधी उपलब्ध होते. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा फायदा या व्यवसायाकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांना निश्चित होईल.
दुग्ध व्यवसायिक आता कुठे जनावरांची वंशावळ विचारू लागला आहे. अॅनिमल न्यूट्रिशन किंवा आहाराच्या नियोजन संदर्भात बोलू लागला आहे. मात्र जागतिक स्तरावरचा आधुनिक दुग्ध व्यवसायिक हा काऊ कम्फर्ट म्हणजे आरामदायक गोठा, मुक्त संचार गोठा, उच्च तापमानात गाईच्या ताणाचे व्यवस्थापन, उच्च प्रतीच्या वळूचे लिंगनिर्धारित सिमेंन किंवा (IVF) तंत्रज्ञानाचा वापर, गोठ्यातील बारीक-सारीक हालचालींसाठी सेन्सरचा वापर, काऊ मॉनिटरिंग सिस्टीम चा वापर, इत्यादी बाबत पारंगत झालेला आहे.
दरम्यान, भारतातील दुग्ध व्यवसाय हा सुद्धा या सर्व बाबतींमध्ये साक्षर आणि सशक्त करण्याकरता या तंत्रज्ञानाचा अवलंब या प्रकल्पामध्ये केला आहे. जेणेकरून सिईंग इज बिलिव्हिंग या तत्त्वानुसार ज्ञान आणि कौशल्य हे दुग्ध व्यवसायिक,शेतकरी, महिला, नवीन उद्योजक, विद्यापीठातील शास्त्रज्ञ,पशुसंवर्धन संबंधित कंपन्यातील तज्ञ, यांना आत्मसात करता येईल असे मत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे व प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे यांनी व्यक्त केले.