(Beed) बीड : भावाच्या मृत्यूनंतर दिराने वहिनीशी तब्बल दीड वर्षानंतर (After the death of his brother, Dira married his sister-in-law the very next day) लग्न केले आहे. ही घटना बीड (Beed News)जिल्ह्यात घडली आहे. दिराने घेतलेल्या निर्णयामुळे बाळाला पित्याचे छत्र मिळाले आहे. तरुणाने घेतलेल्या निर्णयाचे बीड जिल्ह्यासह सर्वत्र कौतुक (Admirable) होत आहे.
प्रमोद पाटणकर याने वाहिनी शिवानी पाटणकर यांच्याबरोबर विवाह केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी पाटणकर या मूळच्या आष्टी येथील आहेत. त्यांचा विवाह बीड येथील शंकर पाटणकर यांच्यासोबत झाला होता. शंकर पाटणकर हे खासगी कंपनीमध्ये ऑपरेटर होते. त्यातून मिळणाऱ्या पगारावर ते आपल्या कुटुबांचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्यावर्षी शंकर पाटणकर यांचा काम करत असताना उंचावून पडल्याने अपघात झाला. यात शंकरला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. अनेक दिवस उपचार सुरू होते. मात्र शंकरला वेदना असह्य झाल्या. अखेर शंकरने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली.
पतीच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शिवानी पाटणकर यांनी बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या डोक्यावरुन पित्याचे छत्र हरपले होते. या बाळाला पित्याचे छत्र मिळावे म्हणून प्रमोद पाटणकर यांनी कुटुंबीयांच्या सल्ल्याने मोठा निर्णय घेतला आणि वहिनीशी लग्न करण्यास होकार दिला. आणि तब्बल दीड वर्षानंतर मंगळवारी नोंदणी पद्धतीने हा विवाह पार पडला. यामुळे चिमुकल्या गोंडस बाळाला वडिलाचे छत्र मिळाले असून नावही मिळाले आहे.
दरम्यान, शिवानी पाटणकर यांच्यासमोर एकीकडे पती गमावल्याचे दुःख होते. तर दुसरीकडे पदरात असलेल्या बाळाचे सुख होते. अशी परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली होती. त्यात बाळाचा संभाळ आणि संगोपन कसे करायचे .हाच मोठा प्रश्न पाटणकर यांना होता. मात्र, या प्रसंगात त्यांचे कुटुंब त्यांच्या पाठिशी उभे राहिले आणि पाटणकर कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला. पाटणकर कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय हा समाजासाठी एक आदर्श आहे.