पुणे : दौंड तालुक्यातील राजेगाव येथील पती पत्नीस दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (ता.7) दुपारी १२ वाजता घडला.
याप्रकरणी रेशमा न्यास काळे वय 30 वर्षे व्यवसाय – मासे विक्री (रा.नवी गोसावीवस्ती राजेगाव ता. दौंड जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार विशाल विलास काळे, बांग्या लतीफ भोसले (दोघे रा.राजेगाव ता.दौंड जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा नदीत तक्रारदार मासेमारीचा व्यवसाय करीत असून तक्रारदारास भीमा नदीत मासे पकडायचे नाही, आम्ही येथे मासे पकडणार अशी धमकी देत पती पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्याने मारहान केली. तसेच धारदार हत्याराने मांडीवर वार केले. याबाबत पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहे.