पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञातांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागणी केली आहे. तसेच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आल्याची घटना नुकतीच उघकीस आली होती. यामध्ये रुपेश मोरे यांचा विवाह एका मुस्लिम मुली सोबत झाला असून विवाह सर्टिफिकेट बनवले असल्याच या मेसेजमध्ये म्हटलं होतं. तर तीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी दिली नाही तर रेप केसमध्ये अडकवण्याची भीती देखील घालण्यात आली होती.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत मुंबईतून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधिक तपास करत असून यामध्ये अनेकजण असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करत ३० लाख रुपयाची खंडणी मागितली आहे.
हे पैसे पुण्यातील खराडी येथील युवान आयटी येथे थांबलेल्या इनोवा कारमध्ये ठेवा, असा व्हॉट्सअपवर मेसेज आला. तसेच, खंडणी दिली नाही तर बनावट विवाह सर्टीफिकेट विविध मोबाईलवरून व्हायरल करण्याची धमकी देत गोळ्या घालण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरु केला आहे. त्यानुसार आता ही धमकी कोणी दिली होती, यामागील कारणे समोर येथील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.