पुणे : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विक्रमन हिने एक्स बॉयफ्रेंडकडून अनूप पिल्लईवर शारीरिक अत्याचार आणि शोषणाचा आरोप केला आहे. तसेच तो सतत धमक्या देत असून कुटुंबावरही चिखलफेक करून त्याची बदनामी केल्याचा आरोपही तिने केला आहे.
मल्याळम चित्रपट अभिनेत्री अभिनेत्री अनिकाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत जे पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये तिचे डोळे सुजलेले आणि जखमी झालेला चेहरा दिसत आहे. फोटोंमध्ये तिचा चेहरा इतका भयानक दिसतोय कि अभिनेत्रीला ओळखणे देखील कठीण झालं आहे. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे
https://www.instagram.com/p/CpZ9q3sPYvr/?utm_source=ig_web_copy_link
अनिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्यासोबत पूर्वी जे काही झालं ते मी मागे टाकलं तरीही मला सतत धमकीचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर सातत्याने चिखलफेक होत आहे. मी दुर्दैवाने अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीला डेट करत होते, पण त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी पाहिला नाही. एवढे करूनही तो मला धमक्या देत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो असे कधी करेल, असं ती म्हणाली आहे.
दरम्यान, ‘जेव्हा त्याने मला पहिल्यांदा मारहाण केली तेव्हा आम्ही चेन्नईत होतो. मग तो माझ्या पाया पडून रडू लागला. त्याला माफ केलं कारण मी मूर्ख होते. बंगळुरूला असताना दुसऱ्यांदा मारहाण झाली. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली. मात्र त्याने पोलिसांना लाच दिली. त्यांनी आम्हाला आपापसात प्रकरण मिटवायला सांगितले. यामुळे त्याला पुन्हा माझ्यावर हल्ला करण्याची हिंमत मिळाली, असा आरोप तिने केला आहे.