पुणे : अहमदनगरमधील बळीराजाला वाटेत खरोखरच सनी देओल भेटला आहे आणि त्या बळीराज्याने चक्क सनिलाच विचारले कि, ‘अरे तुम्ही तर सनी देओलसारखे दिसत आहे.
अभिनेता सनी देओलचा गदर २ चं शुटींग सध्या अहमदनगर येथे सुरू आहे. या शुटींगदरम्यानची धम्माल सनी देओल सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
‘गदर २ च्या शुटींगसाठी अहमदनगर येथे’, असे कॅप्शन देत सनी देओलनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याला बघून एक बैलगाडीवाला त्याला ओळखूच शकला नाहीये. त्याच्या रिॲक्शन व्हिडीओमध्ये कैद करण्यात आल्यात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सनी देओल आणि गदर २ची टीम संध्याकाळच्या वेळेस घरी निघालेल्या एका बैलगाडील्याला थांबवतात. बैलगाडीवाल्याची विचारपूस करतात. त्यानंतर सनी देखोल बैलगाडीवाल्याशी हात मिळवतो.
बैलगाडीवाला नव्या माणसांना पाहून थोडा बावरतो. तो सनी देओलला विचारतो, ‘अरे तुम्ही तर सनी देओलसारखे दिसता’. हे ऐकून सनी देओल हसायला लागतो आणि ‘मी सनी देओलच आहे’, असं म्हणतो. त्यावर बैलगाडीवाला त्याला ‘अरे बापरे’ म्हणत आनंद व्यक्त करतो.
दरम्यान, बैलगाडीवाला म्हणतो, ‘आम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे व्हिडीओ पाहतो’. त्यावर सनी त्याला म्हणतो, ‘तुमच्या गावी येऊन मला माझ्या गावाची आठवण झाली’. दोघांनी बराच वेळ बातचीत केली.