पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत चांगलीच उलथापालथ झाली झाली. रोजच राजकीय नेत एकमेकांच्या अंगावर आरोपाची चिखलफेक करत असतात. मात्र राजकारण एका बाजूला आणि मैत्री एका बाजूला. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. पण मनभेद नसावेत. असे म्हटले जाते. हे सुत्र आपल्या राज्यात चांगलेच जपले जाते.
आज धुलीवंदनाच्या दिवशी कोणती राजकीय चिखलफेक नकरता भाजप आणि राष्ट्रावादीच्या आमदारांनी एकमेकांवर रंगांची उधळण करुन आनंद लूटल. आमदार भिमराव तापकीर आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील होळी खेळण्याचा मोह आवरला नाही. आज मॉर्निंग वॉकला जाताना पुण्यातील तळजाई टेकडीवर त्यांनी होळी खेळण्याचा आनंद लुटला.
शहरासह उपनगरात धुलीवंदनानिमित्ताने चांगलाच जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यात धुलीवंदनाला सुरुवात झाली असताना पुण्यातील तळजाई टेकडी वर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या माजी मंत्री आणि आमदार दत्ता भरणे यांना त्यांच्या मित्रांनी रंगवलं आहे. दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे नेते असून ते ठाकरे सरकारच्या काळात मंत्री होते. तर आमदार भिमराव तापकीर खडकवासला मतदारसंघातून तीन वेळा भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते आज सकाळी मॉर्निंक वॉकला गेले असताना मित्रांसोबत होळी खेळण्याचा आनंद घेतला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यभर धुलीवंदनाचा उत्साह बघायला मिळतोय. प्रत्येकजण आज रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा आनंद साजरा करतोय.