पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञातांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. तसेच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आल्याची घटना नुकतीच उघकीस आली आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करत ३० लाख रुपयाची खंडणी मागितली आहे. हे पैसे पुण्यातील खराडी येथील युवान आयटी थांबलेल्या इनोवा कारमध्ये ठेवा, असा व्हॉट्सअपवर मेसेज आला. तसेच, खंडणी दिली नाही तर बनावट विवाह सर्टीफिकेट विविध मोबाईलवरून व्हायरल करण्याची धमकी देत गोळ्या घालण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरु केला आहे.