यवत, (पुणे) : मोर छाप नावाने बनावट जिप्सम व भेसयुक्त सनला तयार करून विकला जाणाऱ्या कासुर्डी (ता. दौंड) येथील पार्वती इंडस्ट्रीज कंपनीवर यवत पोलिसांनी छापा टाकून कंपनीला टाळे ठोकले आहे. अशी माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
याप्रकरणी पार्वती इंडस्ट्रीचे मालक निलेश रधुनाथ भोंडवे यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक करून तसेच ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचे मशनरी व साठा सिल करण्यात आला आहे. तसेच व्यापार चिन्ह कायदा विविध कलमाद्वारे यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल माणिकचंद कासलीवाल (रा. मनमाड जि. नाशिक) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश रधुनाथ भोंडवे यांची कासुर्डी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत पार्वती इंडस्ट्रीज या नावाने कंपनी आहे. या कंपनीत मोर छाप नावाने बनावट जिप्सम व भेसयुक्त सनला तयार केला जातो. तसेच या कंपनीत मोर छाप नावाने सनला व जिप्सम प्लॅस्टर बनवले जात होते.
याबाबत सुनिल माणिकचंद कासलीवाल यांना माहिती मिळाली होती की , कासुर्डी या ठिकाणी मोर छाप नाव, ट्रेडमार्ग व बनावट रजीस्टेशन नंबर वापरून ही भेसळयुक्त उत्पादने बाजारात विकली जात होती. या बाबत मोर छाप जिप्सम प्लॅस्टर कंपनीचे मालक सुनिल कासलीवाल यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दिलेल्या तक्रारीनुसार यवत पोलिसांनी कासुर्डी येथील कंपनीवर छापा टाकला. तेंव्हा तेथे उत्पादन प्रक्रीया सुरू होती. मुळ कंपनी मोरछाप जिप्सम प्लॅस्टार या कंपनीच्या नावास मिळते जुळती नावे तयार करून न्यू मोरछाप जिप्सम प्लॅस्टर रजि. नं.2983289 व नंबर वन मोर छाप सनला लाईन पावडर रजि. नं. 3878883 या नावाच्या बॅग मिळून आल्या.
दरम्यान, ही नावे बनावट असून ट्रेडमार्ग म्हणून वापरलेले क्रमांक हे ट्रेड़मार्क मागणी करण्यासाठी केलेल्या अॅप्लिकेशनचे नंबर असल्याचे कासलीवाल यांनी सांगितले. त्यानंतर निलेश भोंडवे हे इतर ब्रॅंडचे चिन्हाचा व नावाचा वापर करून माल विक्री करून शासनाची फसवणूक करतात त्याच बरोबर ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करतात हे समोर अल्याने त्यांचे मशनरी व साठा सिल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्ष युवराज पाटील सहाय्यक फौजदार नंदकुमार केकाण, पोलीस हवालदार दिपक वायकर, कमलेश होले, अक्षय कुंभार, निलेश कदम, अक्षय यादव, प्रमोद गायकवाड यांनी केली आहे.