पुणे : सतत्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गरिबांच्या घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. याला आता जनता त्रासली आहे. निवडणुकांचे निकाल हाती येताच घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने महिलांनी रोष व्यक्त केला. या महागाईचा विरोध करत पुणे शहरात राष्ट्रवादीने वाढत्या महागाईची होळी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्य सरकारच्या विरोधातही घोषणा दिल्या आहेत.
गेल्या आठ वर्षापासून केंद्र सरकार मार्फत सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. तसेच सात महिन्यांपूर्वी आलेले शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर होळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. राज्यातील जनतेला कशा प्रकारे महागाई मधून बाहेर काढता येईल. याकडे सरकारचं लक्ष नाही. हे राज्यातील जनतेला माहिती असून जनता यांना चांगलाच धडा शिकविणार आहे. त्यामुळे आज आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला महागाई कमी करण्याची सुबुद्धी व्हावी अशीच प्रार्थना आजच्या होळी निमित्ताने देवाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ५० खोके एकदम ओके, केंद्र सरकारला महागाई कमी होण्याची सुबुद्धी येऊ दे अशा घोषणा देखील देण्यात आल्या.