पुणे : आजकाल डिप्रेशन हा शब्द सर्रास कानांवर पडतो. अनेक लोक या समस्येतून जात आहेत. आनंदी जीवन जगण्यासाठी व डिप्रेशनला लांब ठेवण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करावा –
अति गोड खाण्यामुळे मेंदूत रासायनिक बदल होतात व ताण वाढतो. त्यामुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाऊ नयेत.
मेडिटेशनमुळे मनाला शांती मिळते. ताण-तणावासोबत जुळवून घेण्याची क्षमता वाढते. मेडिटेशनमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येते. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे मेडिटेशन करा.
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण रात्री उशिरा झोपतात. त्यामुळे निद्रानाश, आळस, चिडचिडेपणा वाढीस लागतो. निद्रानाश, चिडचिडेपणा यामुळे डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नेहमीच पुरेशी झोप घेत चला.
मन फ्रेश राहण्यासाठी माणसाला व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायामामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. व्यायाम ही एक अँटिडिप्रेशन प्रक्रिया आहे. म्हणून नियमितपणे व्यायाम करत जा.