दिनेश सोनवणे
दौंड : दौंड पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांच्या समर्थनात आता आम आदमी पार्टी मैदानात उतरली असून या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांची नियुक्ती एप्रिल २०२२ मध्ये झाली होती. भुजबळ यांनी कार्यक्षम, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी सारखे काम केले आहे. यामुळे त्यांच्या कडील प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याचा पद भार काढू नये. कारण की त्यांनी तालुक्यातील काही अनधिकृत व बोगस शाळांवर कारवाईचा बडगा उगारला व संस्था चालकांना घाम फुटला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व फसवणूक होऊ नये. व पालकांना आर्थिक व मानसिक त्रास होऊ नये. म्हणून त्यांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत.
गेल्या चारच महिन्यात राजकीय दबावापोटी किसन भुजबळ यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आला आहे. या मुळे सर्व विद्यार्थी व पालक हवालदिल झाले. या अन्यायाच्या विरोधात आम आदमी पार्टी दौंड शहर व तालुक्याच्या वतीने आज पंचायत समिती समोर मूक निदर्शने केली. आणि. दौंड पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजिक्य येळे यांच्या कडे निवेदन देण्यात आले. या वेळी दौंड शहर व तालुका संयोजक रविंद जाधव, शहराध्यक्ष विक्रम साबळे, तुषार जाधव, रुपेंद्र जैन, शशिकांत वंटे, हासू मोटवानी, संदिप मतकर, नगरे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत बोलताना दौंड शहर व तालुका संयोजक रविंद जाधव काय म्हणतात, ते पाहण्यसाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
या निवेदनात असे म्हटले आहे कि, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक प्रभारी गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांना पुन्हा कार्यभार द्यावा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व पालकांचे आर्थिक नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. ईमानदार अधिकाऱ्यांवर राजकीय दबावापोटी कारवाई करु नये. या मागण्या निवेद्वाना करण्यात आले आहे.