पुणे : जेव्हा आपल्याला सर्वसाधारणप्रमाणे डोकेदुखी होते तेव्हा जास्त त्रास जाणवत नाही परंतु जेव्हा आपल्याला मायग्रेनचा त्रास असतो, तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी उद्भवते. मायग्रेनमुळे डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो.
एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते. मायग्रेन बद्दल जाणून घेतो तेव्हा ही डोकेदुखी सर्वसाधारण डोकेदुखी पेक्षा अधिक गंभीर वेदना देणारी असते, अशा परिस्थितीमध्ये डोकेदुखी शिवाय आपल्या शरीरामध्ये इतर अनेक लक्षणे सुद्धा जाणवू लागतात.
मायग्रेनची लक्षणे
मायग्रेनचा झटका आल्यावर समोरचे न दिसणे, मळमळणे, ओकारी येणे, प्रकाश, आवाज, वास, स्पर्श सहन न होणे, चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे असे त्रास होऊ शकतात.
मायग्रेनवर घरगुती उपाय –
मुबलक प्रमाणात पाणी प्या
मायग्रेनचा त्रास होत असेल तर मुबलक प्रमाणात पाणी प्या. मायग्रेनचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर जास्त वेळ उपाशी राहू नका.
साजूक तूप
मायग्रेन कमी करण्यासाठी नियमित तुमच्या नाकपुडयांमध्ये दोन थेंब शुद्ध तूप टाका.
कोमट तेल
कोमट तेलाने तुमच्या डोक्याला मसाज करा.
सफरचंद
मायग्रेनच्या त्रासातून वाचण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक सफरचंद खा.
दालचिनी
दालचिनी पावडर पाण्यात मिसळून तुमच्या कपाळावर लावा.
काकडी
काकडीचा रस डोक्यावर लावल्याने अथवा काकडीचा वास घेतल्याने तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते.
लवंग पावडर
डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दुधात लवंग पावडर मिसळून ते घेऊ शकता.
पालक आणि गाजराचा रस
मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजराचा रस घ्या.
लिंबाची साले
लिंबाची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट कपाळावर लावा.
मायग्रेन होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या
कडक उन्हात घराबाहेर पडू नका.
प्रखर उजेडात काम करू नका.
डाएटमध्ये फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.
ताण- तणावामुळे मायग्रेन वाढण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे नेहमी आनंदी राहा.
टीप : घरगुती उपायांनी फरक पडतच नसेल तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. कारण कधी कधी मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी गंभीर वेदना देणारी असते.