पुणे : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गरिबीचा फायदा घेत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोल्ड्रिंग्समधून गुंगीचे औषध देऊन तिच्याच मित्राला शारीरीक संबंध करायला भाग पाडले व व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याव्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलकरत ते व्हायरल करण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सागर दिलीप काकडे (वय ३८, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) याला अटक केली. त्याचा मित्र मयुर साळवे (रा. लोणावळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना आंबेगाव पठार, सोमाटणे फाटा, वाकड येथे ११ फेब्रुवारी २०२१ ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली. या तरुणीला काढलेल्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल करत तिला दारू पाजून त्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ देखील काढले. ते देखील व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.