लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचारी सुनील नारायण शिंदे (वय- ४८, रा. कवडीमाळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली, बक्कल नंबर ६५७६) यांच्या आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.
सुनिल शिंदे यांच्या सुनेने कांही दिवसापुर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणात शिंदे आरोपी होते. या गुन्ह्यात न्यायालयात दाखल झालेले “चार्जशिंट” शिंदे यांच्या मनासारखे झाले नसल्याच्या कारणावरुण सुनिल शिंदे यांनी गळफास लाऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता लोणी काळभोर पोलिसांनी वर्तवली आहे.
शहर पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सुनील नारायण शिंदे (वय- ४८, रा. कवडीमाळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली, बक्कल नंबर ६५७६) यांनी बुधवारी मध्यरात्री आत्महत्या केल्याची घटना पुढे आली होती.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांही महिण्यापुर्वी शिंदे यांच्या सुनेने घरगुती कारणावरुन आत्महत्या केली होती. याबाबत शिंदे व त्यांच्या कुटुबांच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला होता. या गुन्ह्याचे चार्जशिट न्यायालयात बुधवारी दाखल झाले होते.
दरम्यान, न्यायालयात दाखल झालेले “चार्जशिंट” मनासारखे झाले नसल्याच्या कारणावरुन त्यांनी आत्महत्या केली असावी. अशी माहिती शिंदे यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे. तसेच लोणी काळभोर पोलिसांच्या प्राथमिक तपासातही वरील कारण पुढे आले आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.