पुणे : आर्थिक कारणामुळे पीएमपीने गेल्या अनेक दिवासांपासून बंद असलेली महिलांसाठीची मोफत बस प्रवासाची योजना पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतीक महिला दिनानिमित्ताने आता पुन्हा या योजनेला गती मिळणार असून महिलांना तेजस्विनी या बसमधून प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला मोफत प्रवास करता येणार आहे. असे पीएमपीने जाहीर केले आहे.
मोफत प्रवासाची योजना आवघ्या तीन दिवसांत म्हणजे येत्या ८ मार्च पासून म्हणजेच अंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू होणार आहे. या योजनेमुळे महिलांना पीएमपीने चांगलेच गिप्ट दिल्याची चर्चाा रंगली असून महिलांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात महिलांसाठी १९ मार्गांवर २४ तेजस्विनी बस सुरू आहेत. स्वारगेट, हडपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, अप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशा अनेक मार्गावर तेजस्विनी बस सुरू आहे.
महिला दिन आता अवघा तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात पीएमपीएमएल प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. एकूण महिलांनी आनंद व्यक्त केला असून पीएमपीनेच प्रवास करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही सांगितले आहे.