पुणे : सहावीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द परिसरात घडली आहे. या घटनेमुळे तिच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मुलीला बेशुद्ध अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी ही इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी घरात कोणी नसताना छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मुलीला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस हवालदार सुरेश शिंदे घटनेचा तपास करीत आहे.