सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील एकूण 9 जिल्हा परिषद गटांचे आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतेनंतर काही ठिकाणी कही गम कही खुशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही विद्यमान सदस्यांना देखील आजच्या सोडतीनंतर त्यांना नवीन गट शोधावे लागणार आहेत.
जिल्हा परिषद आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :-
जिल्हा परिषद गट नंबर 74 – भिगवण-शेटफळगढे -: सर्वसाधारण महिला
जिल्हा परिषद गट नंबर 75 – आंथुर्णे- बोरी :-नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग
जिल्हा परिषद गट नंबर 76 – पळसदेव-बिजवडी :-नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग
जिल्हा परिषद गट नंबर 77 – वडपुरी- माळवाडी :-अनुसूचित जाती आरक्षण
जिल्हा परिषद गट नंबर 78 – निमगाव-शेळगाव :-सर्वसाधारण आरक्षण
जिल्हा परिषद गट नंबर 79 – सणसर-बेलवाडी :-सर्वसाधारण महिला
जिल्हा परिषद गट नंबर 80 – लासुर्णे-वालचंदनगर :-नागरिकांचा मागास प्रवर्ग
जिल्हा परिषद गट नंबर 81 – काटी- वरकुटे :-अनुसूचित जाती आरक्षण
जिल्हा परिषद गट नंबर 82 – बावडा-लुमेवाडी :-सर्वसाधारण आरक्षण