लहू चव्हाण
पाचगणी : महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या विचारांचा वारसा जपत, त्यांच्या कार्याचा आदर्श पुढे घेवून जाण्यासाठी या कार्यक्रमांना भिलार व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे यांनी केले आहे. बुधवारी (ता.८) भिलार येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात महिला दिनाचा कार्यक्रम विविध मान्यवर महिलांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे उद्धाघटन होणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे जीवनमान अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल यादृष्टीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. महिलांनी पुढे आले पाहिजे विविध कार्यक्रमांत भाग घेतला पाहिजे. व्यावसायिक दृष्टीने सक्षम बनविण्यासाठी विविध उपक्रम आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहावे. तसेच ज्या महिलांना विविध गुणदर्शन कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी ७ मार्च पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन तेजस्विनी भिलारे यांनी केले आहे.