उरुळी कांचन, (पुणे) : येथील संतोष बाळासाहेब कांचन (वय-४३) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. ०४) निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. संतोष कांचन यांच्या पार्थिवावर उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.