राहुलकुमार अवचट
यवत : महाराष्ट्र विधीमंडळ हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांची नेमणूक झाल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष अ़ॅड.राहुल नार्वेकर यांनी आज सत्कार करून अभिनंदन केले.
माजी आमदार श्रीमती रंजना कुल यांनी विधानसभा सदस्य म्हणून काम केले, कै. सुभाष अण्णा कुल यांनी विधानसभा सदस्य व विधिमंडळाच्या आश्वासन समितीचे अध्यक्षपदी काम केले होते. दौंड तालुक्यातील जनतेने सलग दुसऱ्यांदा आमदार राहुल कुल यांना विधानसभेत काम करण्याची संधी दिली.
महाराष्ट्र विधीमंडळ हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष अ़ॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार राहुल कुल यांनी आभार व्यक्त केले.