पुणे : पिंपरी-चिंचवडच्या डांगे चौकात ऑईल सांडल्याने 15-20 दुचाकींस्वार घसरून पडले. या घटनेत काही दुचाकीस्वार जखमी झाल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरवर ऑईल सांडल्याने अनेक दुचाकी घसरल्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून पाण्याने रस्ता स्वच्छ केला.
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरवर टँकर मधून ऑईल झाली. काही सेवाभावी नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक थांबवली.
दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून तेल रस्त्यावर टाकले. पुणे आणि परिसरातही पूर्वी अशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांनी दुचाकी चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.