पंढरपूर : पंढरपूर येथिल विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांची आरास करण्यात आली होती, मात्र सजावटीच्या अगदी काही तासांतच ही द्राक्ष गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या सुमारास सजावट केलेली द्राक्ष अवघ्या काही तासांत गायब झाल्याने त्याची चर्चा संपुर्ण पंढरपूरात रंगली आहे.
पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि बारामतीचे बाळासाहेब शेंडी यांच्या वतीने विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात ही द्राक्षांची सकाळी सहा वाजता ही आरास करण्यात आली होती. मात्र अवघ्या अर्ध्या तासात ही द्राक्ष मंदीरातून गायब झाली. ही द्राक्ष भाविकांनी नेल्याचे मंदिर समितीचे म्हणणे आहे.
पंढपूरातील विठ्ठल रुखुमाईच्या मंदिरात एक टन द्राक्षांची नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती. ही द्राक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून नेल्याचा मंदिर समितीचे म्हणणे आहे. तर काही भाविकांनी मंदिरातील कर्मचारी यांनीच द्राक्ष नेली असल्याचे म्हटले आहे. आरास केलेली एक टन द्राक्ष एका तासात गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मंदिरातील द्राक्षे नेमकी भाविकांनी नेली की अन्य कोणी यायची जोरदार चर्चा पंढरपूरात सुरू आहे. असून आज अंमलकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी केली आहे. अनेक सण-समारंभ तसेच एकादशीच्या निमीत्ताने मंदिरात अशा प्रकारची आरास करण्यात येते. अशी आरास दिवसभर ठेवली जाते जेणेकरून भाविकांना ती पाहाता येईल. मात्र, आरास केल्याच्या अर्ध्या तासांतच ही द्राक्ष गायब झाली. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.