पुणे- शिवाजीनगर पोलिस पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सुनील नारायण शिंदे (वय- ४८, बक्कल नंबर ६५७६) यांनी काल (बुधवारी) मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घऱी गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
सुनील शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नसुन, लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सुनिल शिंदे हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हदीतील कवडीमाळवाडी परिसरात मागिल काही वर्षापासून राहत होते. काल रात्री नेहमीप्रणाने आपल्या खोलीत झोपण्यास गेले होते. आज सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास, शिंदे यांनी खिडकीच्या पडद्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडील उठले का नाहीत यासाठी मुलाने आवाज दिला. मात्र खोलीमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी खिडकीतून पाहिले असता, वरील प्रकार आढळुन आला. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल घोडके, व पोलीस हवालदार तेज भोसले पोहचले असून, पुढील कारवाई सुरु आहे.