हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होळकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने अफूची लागवड करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजाराम दामोदर होळकर (वय-५० रा. होळकरवाडी, ता. हवेली) व बाळु किसन कटके (वय ५० वर्षे, पाटीलनगर, होळकरवाडी, ता. हवेली) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या शेतातून ११ लाख ६० हजार रुपये किंमतीचे व ११६ किलोग्रॅम वजनाचे, १ हजार ३७४ आफुचे झाडे मिळून आली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून समुळ उच्चाटनच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधिकारी व अंमलदार यांची गस्त वाढवली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता. ०१) गस्त घालीत असताना पोलिसांना औताडेवाडीकडुन होळकर वाडीकडे जाणारा ओढयामधील चिमणी तलावाच्या शेजारी, पुर्वेस गव्हाच्या शेतात अफु या अंमली पदार्थांची विक्री करण्याचे उद्देशाने आफुचे झाडांची लागवड करण्यात आली’ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता ११ लाख ६० हजार रुपये किंमतीचे, व ११६ किलोग्रॅम वजनाचे, १ हजार ३७४ आफुचे झाडे मिळून आली. याप्रकरणी दोन्ही शेतमालक यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे हे करीत आहेत. अशाप्रकारची शेतामधील कारवाई लोणी काळभोर पोलिसांनी प्रथमच केली आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस नाईक साळुंके, पोलीस शिपाई विर, कुदळे, नानापुरे यांचे पथकाने केली आहे.