विशाल कदम
लोणी काळभोर – वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील उबाळे नगर परिसरात असलेल्या जयभवानी लॉजवर खुलेआम सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दापाश करण्यास सामाजिक सुरक्षा विभागाला यश आले आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक तरुण करून लॉजवर बुधवारी (ता.१ मार्च) छापा टाकून चार परप्रांतीय तरुणींची सुटका केली आहे. तर लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लिंबाजी सखाराम वाघमारे (वय २९, रा. आळंदी फाटा, लोणीकंद) व प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी सरकारच्या वतीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली ग्रामपंचायत हद्दीतील उबाळे नगर परिसरात असलेल्या जयभवानी लॉजवर वेश्याव्यवसाय सुरु आहे. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने पर्दापाश केला आहे.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री असता, लॉजवर चार तरुणी वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. पोलिसांनी या कारवाईत एका बांगलादेशी तरुणीसह पश्चिम बंगालमधील तीन तरुणींना ताब्यात घेतले. पीडित तरुणींना न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसरमधील निरीक्षणगृहात ठेवण्यात आले.
दरम्यान, लोणी कंद पोलीस ठाण्यात आरोपी वाघमारे आणि पुजारी यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी लिंबाजी वाघमारे याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार प्रवीण पुजारी हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.