युनूस तांबोळी
शिरूर : प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांमध्ये दुरदृष्टी पहावयास मिळते. त्या दुरदृष्टीचा विज्ञानाच्या अभ्यासात शिक्षकांनी वापर करून घेतला पाहिजे. त्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे शालेय उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता सुधारत असताना त्यांच्यातील व्यवहार चातुर्य ओळखून त्यांना ज्ञानाचे धडे दिले पाहिजे. यासाठी पालकांची मदत शिक्षकांनी घेऊन त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे. असे मत राज्य पुरस्कार प्राप्त विज्ञान शिक्षक संभाजी ठुबे यांनी व्यक्त केले.
रांजणगाव ( ता. शिरूर ) येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन आणि बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके,संचालक योगेश लांडे, काशिनाथ पाचंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच विविध सहशालेय उपक्रमांच्या आयोजनामध्ये अग्रेसर असलेल्या महागणपती ग्रुप ऑफ स्कूलराष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन त्याचप्रमाणे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार ज्ञान मिळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे शेळके यांनी सांगितले.
यावेळी मुलांनी संग्रहित केलेल्या कविता,लेख,चारोळ्या यांचे हस्तलिखित अक्षरधारा त्याचप्रमाणे विज्ञान हस्तलिखित विजन सायन्स बुक याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्ये फळे, भाजी, स्टेशनरी, कटलरी, थंडपेय विविध फूड स्टॉल्स आदींचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी प्राचार्य अरविंद गोळे, अबिदा आत्तार, वंदना खेडकर, सोनाली नलावडे, पद्मिनी कवठेकर, स्मिता गोळे, निलेश फाफाळे , मच्छिंद्र खैरनार, स्वाती दंडवते, प्रियंका पवार, तृप्ती शेळके, ज्योती साबळे, वि. भा. कळसकर, राणि वाळके, कांचन खेडकर, योगिता जाधव, मोनाली कल्लापुरे, जयश्री तंगड, सुरेखा लाड, प्रविण काळे, आब्बास शेख, शहेनाज शेख, प्रियंका साठे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.