लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जेष्ठ विज तांत्रिक बाळासाहेब लक्ष्मण सायकर यांची महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची नांदेड येथे नुकतीच बैठक पार पडली. हि बैठक संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोदिन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बाळासाहेब सायकर यांची सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, बाळासाहेब सायकर हे महावितरण मध्ये विज तांत्रिक काम करीत आहेत. तसेच त्यांनी कामगार सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्षपद देखील भूषविले असून ते सध्या विद्याम्मान संचालक म्हणून काम पाहत आहेत.
याबाबत पुणे प्राईम न्यूजशी बोलताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष बाळासाहेब सायकर म्हणाले कि, संघटनेनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पडणार आहे. या पदाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न, संमस्या समजावून घेऊन त्या माझ्या पातळीवर त्वरित सोडविणार आहे. तसेच महाराष्ट्रात संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे सायकर यांनी सांगितले आहे.