लहू चव्हाण
पांचगणी : भारती विद्यापीठ गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूल पांचगणी येथे भारती विद्यापीठ संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे दिवंगत जेष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव स्व.अभिजीत दादा कदम यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य कुर्माराव रेपाका, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्व.अभिजीत दादा व डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. महेश कांबळे यांनी आपल्या अभिवादनपर भाषणात स्व. अभिजीत दादांचे चरित्र व कार्य यावर प्रकाश टाकला.
भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम, आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रेरणेने, संचालक एम. डी.कदम व डॉ. अरुंधती निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.