राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : बोरीपार्धी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत एका हॉटेलबाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोख रक्कम व कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. २३) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी शशीकांत दादाभाउ गाडेकर (वय ३८ वर्षे व्यवसाय नोकरी रा. निवासी मतिमंद विद्यालय आनंद विहार कॉलनी नं- १ हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सव्वा सात ते आठ वाजण्याच्या सुमारास शशिकांत गाडेकर हे जेवणासाठी बोरीपार्धी ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल जय तुळजाभवानी या ठिकाणी थांबले होते.
यावेळी चारचाकी गाडी त्यांनी हॉटेलच्या बाहेर थांबवली होती व जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपास केले.
या गाडीत प्रतिष्ठान हिंगणे खुर्द, सिंहगड रोड पुणे, संस्थेचे सहया केलेले एसबीआय बॅंकेचे कोरे चेकबुक, निविासी मतिमंद मुलांची कृशिकार्यशाळा, संस्थेचे देउळगावराजे पीडीसीसी बॅंकेचे कोरे चेकबुक, निवासी मतिमंद मुलांची कृशिकार्यशाळा संस्थेचे लेटरहेड व शिक्के होते.
जेवण करून बाहेर आले असता त्यांना गाडीचे ड्रायव्हरच्या बाजुचे पाठीमागील दरवाज्याची काच फुटलेल्या अवस्थेत आढळून आली. व गाडीत ठेवलेली ५० हजार रुपये रोख रक्कम व कागदपत्रे तसेच एटीएम कार्डचा पांढरे रंगाचा लिफाफा चोरून नेहला. आजूबाजूला लोकांशी तसेच नागरिकांना विचारपूस केली मात्र कोणीही काही पहिले नाही असे सांगितले.
दरम्यान, यावरून कोणीतरी आपल्या गाडीतून रोख रक्कम पन्नास हजार रुपये चोरून नेल्याची खात्री झाली. यावरून यवत पोलिसात फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.