पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पहिली पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये ठाकरे अतिशय आक्रमक मूडमध्ये दिसले.
ते म्हणाले, “शिवसेनेचे चिन्ह आमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही धनुष्यबाण हेच पक्षाचे निवडणूक चिन्ह राहील. त्यांनी आमच्याकडून ते हिसकावून दाखवावे
एकनाथ गटाच्या बाजूने जाणाऱ्या आमदारांबाबत ठाकरे म्हणाले की, आमदारांनी शिवसेनेची साथ सोडली असली तरी शिवसेना अबाधित राहील. जनतेच्या हितासाठी आम्ही महापालिका निवडणुकीत लढू.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी दिल्लीला जाणार आहेत. गेल्या महिन्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच राष्ट्रीय राजधानीचा दौरा आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. शिंदे यांच्या प्रवास कार्यक्रमानुसार ते शुक्रवारी संध्याकाळी सरकारी चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना होतील.