पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने बाजारात कलिंगड, खरबुजासारख्या फळांना मागणी वाढली आहे. तसेच त्यांच्या दरातही सरासरी प्रतिकिलो २ रुपयांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच बाजारात चांगल्या दर्जाची पपई नसल्याने तिच्या मागणी अभावी पपईचे भाव किलोमागे दोन रुपयांनी घसरण झाली आहे.
रविवारी (ता. १९) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून ६ ट्रक अननस दाखल झाले असून, ३० टन संत्री, ४० ते ५० टन मोसंबी, १५ ते २० टन डाळिंब, १० ते १५ टेम्पो पपई, सुमारे दीड हजार ते दोन हजार गोणी लिंबे, ३०० ते ४०० क्रेटस पेरू, ३० ते ४० गाड्या कलिंगड, २० ते २५ गाड्या खरबूज आणि २ ते ३ पोती इतकी बोरांची आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : ४००-१२००, अननस : १०० -५०० , मोसंबी : (३ डझन) : २०० -४००, (४ डझन) : ४० -१६०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८० -२०० , गणेश : १० -४० , आरक्ता २० -८०. कलिंगड : ५ -१० , खरबूज : १० -२५ , पपई : ५ – २० , पेरू (२० किलो) :४०० -५००, चिक्कू (१० किलो) : १०० -५५०, बोरे (१० किलो) : चेकनट : १०००-१२०० , चण्यामण्या : ७००-८००. द्राक्षे (१० किलो) : सुपर सोनाका : ५००-६००, सोनाका : ४५०-५५०, माणिकचमन : ३००-४५० जम्बो : ५००-८००, शरद : ४५०-६००.