पुणे – उधारीचे पैसे देतो अशी बतावणी करून एकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना कुरुळी (ता.खेड) येथील युनोमोल्ड प्रा.लि. कंपनीच्या गेट समोर शनिवारी (ता.१८) घडली आहे.
मधुकर रामसू चव्हाण (वय ४३ रा.चिंबळी) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परमानंद रामसिंग अहिरबाद (वय-२७ रा. कुरळी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कपड्याचे दुकान आहे. फिर्यादी यांनी कपड्याच्या दुकानाच्या उधारीचे पैसे आरोपीला मागितले.
त्यानंतर आरोपीने पैसे देतो म्हणून कुरुळी (ता.खेड) येथील युनोमोल्ड प्रा.लि. कंपनीच्या गेट समोर बोलावून घेतले. व फिर्यादीच्या उजव्या हातावर लाकडी दांडक्याने मारून हात फ्रॅक्चर केला व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.