पुणे : शिवजयंतीच्या निमित्त निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आज रविवारी (ता.१९) वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यांमुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
दरम्यान, शहराच्या लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांमुळे सकाळी सात वाजल्यानंतर मध्यवर्ती भागातील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. तर गर्दी कमी होईपर्यंत नेहरु रस्ता, लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
पुढील बंद रस्ते व पर्यायी मार्ग…
१) छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
२)गणेश रस्त्यावरुन लाल महाल चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी दारुवाला पूलमार्गे इच्छितस्थळी जावे.
३) केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक, बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे
४) लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक सोन्या मारुती चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर संत कबीर चौकातील वाहतूक वळविण्यात येईल
५) पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका टॉकीज चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
६) मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे तसेच बाजीरावर रस्त्याने फुटका बुरूज चौकाकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात येईल.
७) या भागातील वाहतूक केळकर रस्त्याने वळविण्यात येणार आहे.
८) वाहनचालकांनी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन बालगंधर्व चौकाकडे जावे.