दिपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कुरवली या ठिकाणी शुक्रवारी (दि.१७) शॉर्टसर्किटमुळे दुकानांना लागलेल्या आगीमुळे दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी (दि.१८) या दुर्घटनेची निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी प्रत्यक्षात पाहणी केली व नुकसानग्रस्तांना आधार दिला.
शुक्रवारी लागलेल्या आगीत सागर नारायण रूपनवर यांचे इलेक्ट्रिक अँड फर्निचर दुकान, गणेश आबाजी जठार यांचे ऑटोमोबाईल्सचे दुकान व श्रीदत्त कृषी सेवा केंद्र यांचे दुकान शॉर्टसर्किट झाल्याने या दुकानांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या या तिन्ही दुकानांचे पंचनामे त्वरित होण्यासाठी राजवर्धन पाटील यांनी प्रयत्न केला.
शॉर्ट सर्किटमुळे झालेले नुकसान मोठे आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन यावेळी दुकानदाराशी बोलताना राजवर्धन पाटील यांनी केले.