दीपक खिलारे
इंदापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्य बाण चिन्ह देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे इंदापूर शहरात शिंदे गटाच्या वतीने पेढे वाटून व फटाके फोडून शनिवारी (दि.18) स्वागत केले.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान शिंदे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर संपर्क कार्यालयावरील बाळासाहेबांची शिवसेना असलेला फलक काढून त्याजागी नव्याने शिवसेनेचा धनुष्यबाणाच्या चिन्हाचा फलक लावण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर, शहराध्यक्ष अशोक देवकर, महिला शहराध्यक्षा निर्मला जाधव, वैद्यकीय मदत कक्षाचे सागर आवटे, दुर्वास शेवाळे, बबन पाटील, वसंत आरडे, बबन खराडे आदी उपस्थित होते.