पुणे : चाकण येथील कंपनीत दुचाकीने कामावर निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अचानक बिबट्याने धडक दिल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (ता. १६) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
अभिजित महादेव शिंदे (वय-२५, रा. जवळे, ता. आंबेगाव) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित जवळे हा महिंद्रा कंपनीत कामाला असून त्याला फस्ट शिप असल्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून कामाला निघाला होता. यावेळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वळसेमळा हद्दीत एक बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्याच्या दुचाकीच्या पुढच्या बाजूला धडकला बिबट्या जोरात धडकल्याने शिंदे हा दुचाकीसह रस्त्यावर पडला.
बिबट्याची दुचाकीला पुढच्या चाकाला धडक बसल्याने तरूण दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने जखमी झाला आहे. या अपघातात त्याच्या हाताला, डोक्याला, पायाला मोठ्या प्रमाणात मार लागला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.