पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुण्यातील कार्यालयावर आयकर विभागाने आज बुधवारी (ता.१५) छापे टाकले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्यात आयकर विभागाने एकूण सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे याच्याही कार्यालयावर छापा टाकला आहे. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती.