युनुस तांबोळी
शिरूर : विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखूनच परीक्षांना सामोरे जा. पेपर लिहताना मन विचलीत होऊ देऊ नका. परीस्थितीची जाणिव ठेवून
परीक्षांना सामोरे जात असताना ‘कॅाफी’करून वेळ वाया घालवू नका. भविष्यात यशस्विता मिळविताना ‘कॅाफी’ करता येत नसल्याने
यश मिळविण्यासाठी पुर्ण क्षमतेने परिक्षेला सामोरे जा. तुम्हाला नक्किच यश मिळेल. असे मत साहित्यिक, लेखक, कथाकथनकार,
व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले.
पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० व १२ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व माजी
विद्यार्थी आयोजीत विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य रामदास मगर, संस्थेचे अध्यक्ष अरूण ढोमे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर शेळके, विकास वरे, प्रकाश गुजर, बबन बोंबे, शिवाजी बोंबे, किरण ढोमे, माऊली ढोमे, पोपट बारहाते, तानाजी पोखरकर, राजेंद्र बोंबे, रामदास बोंबे, भाऊसाहेब बोंबे, भाऊ कोयमहाले, निवृत्ती बोंबे आदी ग्रामस्थ, शिक्षक, विदयार्थी उपस्थित होते.
दरम्यान, सामान्यज्ञान व सकाळ चित्रकला स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संस्थेकडून बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकिरा पंचरास यांनी केले. प्रा. सचिन बऱ्हाटे यांनी आभार मानले.