पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात ‘फिटल मेडिसिन युनिट’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गर्भातील बाळाला एखादे व्यंग असल्यास, बाळ गर्भात असतानाच समजणार आहे. अशी माहिती बी. जे. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर यांनी दिली आहे.
यावेळी स्त्रीरोग व प्रसुती विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबे, रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शेफाली पवार, डॉ. सचिन बगले, फिटल मेडिसिन प्रमुख डॉ. चिन्मय उमरजी, डॉ. पूजा साबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाकूर म्हणाले कि, हृदय, मेंदू, फुफ्फुस यासह अन्य आजाराचे व्यंग बाळांमध्ये अढळून येतात. प्रसुतीनंतर अशी मुले दगावण्याची भिती अधिक असते. त्यामुळे बाळ आणि त्याच्या कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावे लागते. हे टाळण्यासाठी आता फिटल युनिट नक्कीच फायद्याचे ठरेल. असेही ठाकूर यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना डॉ. संजयकुमार तांबे म्हणाले कि, ससून रुग्णालयात दरवर्षी अकरा हजाराहून अधिक प्रसुती होतात. सोनोग्राफीमधून सर्व व्यंग लक्षात येत नाहीत. त्यामुळे काहीवेळेस बाळाच्या व्यंगाबाबत उशीरा किंवा प्रसुतीनंतर समजते. मात्र, फिटल मेडिसिन युनिटमुळे व्यंगाबाबत तीसऱ्या ते पाचव्या महिन्यात समजू शकते आणि गर्भपात करता येऊ शकतो, अशी माहिती तांबे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना फिटल मेडिसिन प्रमुख डॉ. चिन्मय उमरजी म्हणाले कि, ससून रूग्णालय सोनोग्राफी, आईच्या रक्तामधील डिएनए आणि बाळातील डीएनए या तपासणीतून बाळाला व्यंग आहे की नाही हे समजू शकते. वेळेत निदान झाल्यामुळे गर्भापत करणे शक्य होते. तसेच महिलेला होणारा त्रासही कमी होतो.
दरम्यान, गर्भात वाढत असलेल्या बाळामध्ये एखादे व्यंग असल्यास ते प्रसुतीनंतर समजते. व्यंगामुळे जन्मलेल्या बाळाला काचेत (एनआयसीयू) ठेवावे लागते. हात, पाय यासह शारीरिक व्यंग असलेले बाळ जन्मल्यावर त्याचे उपचार, सांभाळ करण्यात पालकांसह कुटुंबाची मोठी फरफट होते. तर बाळालाही आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. यामधून सुटका व्हावी.
यासाठी, गर्भातील बाळामध्ये काही व्यंग आहे की नाही याबाबत गर्भातच समजावे, व्यंग असल्यास वेळीच गर्भापत करून महिलेला सुरक्षित ठेवणे या सर्व गोष्टी करणे शक्य होणार आहे.