लोणीकंद : लोणीकंद पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातभट्ट्यांवर कारवाई करत मौजे पेरणे, भावडी व अष्टापुर येथील हातभट्टी उद्धवस्त केली. ही कारवाई गुरुवारी (ता.९ ) केली.
या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपयांचा हातभट्टी दारुचा माल नष्ट केला. तर, भावडी गाव येतील बोरकर मळा येथे करण्यात आलेल्या कारवाईत ५०० लिटरच्या तीन टाक्या फोडून त्यातील दीड हजार लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट केले.
डोंगर गाव ओढ्यालगत सिमेंट विट बांधकाम केलेली टाकी फोडून त्यातील दीड हजार लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट करुन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ५३ हजार रुपये किमतीचे ३ हजार लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन, हातभट्टी दारु व हातभट्टी बनवण्याचे इतर साहित्य नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा , पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरुंगे , पोलीस अंमलदार दिपक ठाणगे, बाळासाहेब सकाटे, संदेश शिवले, अमोल भोसले, नितीन मोरे, बाळासाहेब तनपुरे, सागर पाटील, तुषार पवार, प्रशांत धुमाळ, बेलेकर यांच्या पथकाने केली.