युनूस तांबोळी
शिरूर : राज्यात सहकारी आणि खाजगी कारखाान्यांनी ऊस कारखानदारीचे जाळे वाढले आहे. ऊस कारखानदारी नेहमीच बाजारभावामुळे धोक्यात आल्याची चर्चा होत असते. निसर्गाच्या लहरीपणामुळे उसाच्या उत्पादनात कारखानदारीच्या अपेक्षा पेक्षा ऊसाचे कमी उत्पादन होऊ लागले आहे. त्यातून साखरे बाबत निर्यातीचे धोरण चुकत असल्याने बाजारभाव कमी मिळत असल्याची चर्चा आहे.
वाढत्या तांत्रीक पद्धतीचा अवलंब ऊस कारखानदारीत होत असला तरी मजुरांची ऊसतोडणी संदर्भातील माणसिकता पहाता, ऊस तोडणी मजूरांची समस्या देखील जाणवू लागली आहे. त्यातही मुकादमाची मध्यस्थी यामुळे ऊसतोडणी कामगार मिळण्यासाठी होणारी फसवणुक मोठी आहे. भविष्यात ऊसतोडणी कामगाराच्या समस्या समजून घेतल्या गेल्या नाहीत, तर मात्र हे ऊसतोडणी कामगार ऊस कारखानदारीवर पाठ फिरवतील की काय? असे चित्र आहे. त्यामुळे ऊस कारखानदारी धोक्यात येऊ शकते.
उसाची कमतरता…
गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाच्या प्रमाणात सातत्य राहिल्याने तसेच वारंवार पडलेला पाऊसामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करता आली नाही. वेळेत मशागत करता न आल्याने खताची मात्रा देण्याचे प्रमाण कमी झाले. उन्हाचे प्रमाण कमी असल्याने ऊसाच्या उत्पादनावर त्याचा विलक्षण परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऊसाचे उत्पादन घटले आहे. दरवर्षी सरासरी पेक्षा या वर्षी साखरेचे उत्पादन वाढेल अशी आशा होती. मात्र या वर्षी खोडवा उसाचे प्रमाण हे ५० ते ५५ टक्के असल्याने साखरेच्या उत्पादनात घट पहावयास मिळत आहे.
बाजारभाव…
साखरेचे घटलेले प्रमाण पाहता व साखरेचे निर्यातीचे धोरण चुकल्याने सध्या साखरेला ३२५० ते ३३५० रूपये क्विंटल असा बाजारभाव मिळू लागला आहे. त्यातून साखरेच्या बाजारभावापेक्षा साखरेच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला अपेक्षित बाजारभाव मिळेल की नाही या बाबत शंका उत्पन्न केली जात आहे.
ऊसाची कमतरता…
नोंदी केलेल्या ऊसाची तोडणी रितसर कारखाना करत असतो. त्यानूसार ऊस कारखान्याच्या धोरणाने ऊसतोडणी सुरू करण्यात आली. यासाठी बैलगाडा, टॅक्ट्रर व हार्वेस्टरच्या सहाय्याने ही तोडणी करण्याचे काम करण्याात आले. टॅक, टॅक्ट्रर च्या सहाय्याने तोडणी केलेला ऊस देखील वाहतूक करून आणण्यात आला. मात्र पावसाळी वातावरणामुळे व ऊशीरा आलेल्या टोळ्यांमुळे ऊसाची वाहतूक पाहिजे तशी झाली नाही.
त्यात ऊसाची वाढ नसल्याने कमी वेळात अधिक ऊस वाहतूक करण्यात आला. कमी वेळात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करण्याचे कारखान्याचे धोरण असल्याने ऊसाचे गाळप जोरात सुरू झाल्याने आता ऊसाची कमतरता भासत आहे. त्यामुळे या वर्षी ऊस
कारखान्याचा पट्टा लवकरच पडणार असल्याचे चित्र आहे.
ऊसतोडणी कामगारांच्या समस्या…
ट्रक व टॅक्ट्रर मालक मुकादमामार्फत ऊसतोडणी कामगार टोळीचे नियोजन करत असतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उचल दिली जाते. मात्र उचल घेऊन हे मुकादम फरार होतात. त्यातून ऊसतोडणी कामगारांची समस्या निर्माण होताना दिसते.
शेतकऱ्यांची फसवणूक
शिरूर तालुक्यातील मलठण येथील दत्तात्रेय किसन गायकवाड यांची जानेवारी २०२१ पासून ‘तुम्हाला खात्रीने उसतोड कामगार पुरवितो’ असा विश्वास देऊन एकतीस लाख साठ हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. या बाबत शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी गणेश बन्सी राठोड, व लहू बढी चव्हाण (राहणार तुपेवाडी, तांडा,पो.बावणे पांगरी, ता.बदनापूर, जि.जालना) यांच्या विरूद्ध गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
एवढी रक्कम घेऊनही उसतोड कामगार न पुरविता, घेतलेली रक्कम गायकवाड यांना आजपर्यंत परत केली नाही. त्यामुळे शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय बिबट्याचे वाढलेले प्रमाण यामुळे ऊसतोडणी कामगार भविष्यात ऊस कारखानदारी कडे पाठ फिरवतील की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार पडणाऱ्या पावसामुळे शेतीची मशागत व खताची मात्रा देता आली नाही. त्यामुळे या वर्षी ऊसाचे उत्पादन कमी प्रमाणात तयार झाले. निर्यात धोरणामुळे साखरेचे बाजारभाव कमी आहे. या वर्षी खोडवा उसाचे प्रमाण अधिक असून ऊसाच्या कमतरतेमुळे मार्च अखेर पर्यंत कारखाने सुरू राहतील. अशी माहिती मुख्य शेतकी अधिकारी अंकुश आढाव (पराग ॲग्रो फुड्स अँड अलाईड प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड रावडेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे.) यांनी दिली आहे