ठाणे : पगारवाढ रोखल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या एका कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकाची थेट हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली असून यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला पेण येथून पोलिसांनी अटक केली आहे.
बसवराज गर्ग असे खून झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे तर पंकज यादव असे आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज यादव आणि बसवराज गर्ग हे दोघे २०१० साली एकत्र काम करत होते. पंकज यादव याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे आहे. तर बसवराज गर्ग हे आरपीएफच्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पंकज यादव याची बसवराज गर्ग यांनी विभागीय चौकशी केली होती. ज्यामध्ये पंकज यादव यांची ४ वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली होती. त्यामुळे बसवराज ४ वर्षांपासून गर्गवर चिडले होते. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंकज यादव पेणहून कल्याणला आला आणि त्याने पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास बसवराज गर्गची यांची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन संशयित आरोपी पंकज यादव याला पेण येथून अटक केली. आरोपी पंकज यादव याला सकाळी अटक करून कोळसेवाडी पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीच्या चौकशीत सहभागी असलेल्या इतर तीन पोलिसांना सुद्धा आरोपीला मारायचे होते. मात्र, त्याला आधीच अटक झाल्याने त्याचा डाव फसला. या प्रकरणाचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करीत आहेत.