पुणे : पुण्याचे माजी महापौर व राज्य संघटन सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी प्रभारी म्हणून निवड करण्यासंबंधीचे परिपत्रक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहे.
या परिपत्रकात प्रभारी म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पर्वतीच्या आमदार या माधुरी मिसाळ यांच्याकडे निवडणूक प्रमुख तर माजी नगरसेवक धीरज घाटे यांच्याकडे निवडणूक सहप्रमुख ही जबाबदारी देण्यात आली आहे.
चिंचवड मतदार संघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना निवडणूक प्रमुख करण्यात आले आसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तसेच सर्वांना सोबत घेवून जबाबदारी योग्यरित्या पार पाडाल, असे आवाहन देखील या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.