पुणे : पुणे विद्यार्थी गृह संचालक मंडाळाच्या कार्याध्यक्षांना पगार व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद घालत एका महिला सेवकाच्या सांगण्यावरून बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.
श्रीकांत शिळीमकर, रेणुका गोडबोले यांच्यासह ३० ते ४० जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील रेडेकर (वय. ५७) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी सुनील रेडेकर पुणे विद्यार्थी गृह येथील संचालक मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. तर रेणुका गोडबोले संस्थेत अभियांत्रिक महाविद्यालयात सेविका आहेत. त्या दोघांमध्ये स्वत:च्या पगारावरून आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद झाला.
रेणुका गोडबोले यांच्या सांगण्यावरून श्रीकांत शिळीमकर व इतर हे संस्थेत रात्री शिरले. त्यांनी सुनील रेडेकर यांना त्यांच्या पत्नी व कुटूंबासमोर शिवीगाळ केली. त्यांना अपमानित करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकणी सुनील रेडेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.