परंडा : परंडा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ तथा उस्मानाबाद जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अॅड. दादासाहेब खरसडे यांचा महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या हीरक महोत्सवी (६० वर्षे) वर्षानिमित्त गौरव करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व न्या. भूषण गवई यांच्या हस्ते औरंगाबाद येथील न्या. बी. एन. देशमुख सभागृहात शनिवारी (ता. २३) राज्यस्तरीय वकील परिषदेत गौरव करण्यात आला. या परिषदेत चाळीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे वकिली करून सामाजिक बांधिलकी जपलेल्या १२ ज्येष्ठ वकिलांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. संभाजी शिंदे, न्या. प्रसन्न वराळे, न्या. संजय गंगापूरवाला, न्या. नितीन सांबरे, न्या, रवींद्र घुगे, न्या. सी. डी. भडंग, न्या. मंगेश पाटील, न्या. सारंग कोतवाल, न्या. विभा कंकणवाडी, न्या. आर. जी. अवचट, न्या. नितीन सूर्यवंशी, न्या. एस. जी. मेहरे, न्या. एस. जी. डिगे, न्या. अनिल पानसरे, न्या. संदीपकुमार मोरे, न्या. भारत देशपांडे, न्या. एस. व्ही. कुलकर्णी, न्या. किशोर संत ,राष्ट्रीय वकील परिषदेचे अध्यक्ष अॅड. मननकुमार मिश्रा, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मिलिंद साठे, नितीन चौधरी, संतोष हीरक, माजी कायदामंत्री अॅड. रामचंद्र पाटील, महाराष्ट्र बार कौन्सीलचे अध्यक्ष व्हि.डी. साळुंके, कौन्सीलचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी अॅड. मिलींद पाटील तसेच मुंबई, पुणे, नागपुर , औरंगाबाद यांसह महाराष्ट्रातून वकिल मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, परंडा येथील अॅड. संतोष सुर्यवंशी, संदीप पाटील, अभिजित मोरे, गणेश खरसडे, दत्तात्रय सुर्यवंशी, शोएब शेख, भालचंद्र औसरे, आप्पासाहेब जगताप, टि .यु. वाघमारे, रणजित खरसडे, हरिभाऊ सुर्यवंशी, नागनाथ सुर्यवंशी, बापु जामदारे, व्ही .एम. काळे, गोविंद कोटूळे, अशोक गरड, विजय शिंदे आदि उपस्थित होते .या परिषदेत चाळीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे वकिली करून सामाजिक बांधिलकी जपलेल्या १२ ज्येष्ठ वकिलांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.