पुणे : पुण्यात नासाच्या नावाने शेकडो लोकांना ६ कोटींना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी जवळपास १०० तक्रारदारांनी आपल्या तक्रारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत.
राम गायकवाड (रा. माळवाड, अकलुज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय ५०, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. यामध्ये तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे सांगितले. त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केला
दरम्यान, सदर नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. यात आतापर्यंत १००हून अधिक लोकांचे तक्रार अर्ज आले आहे. तसेच प्राथमिक तपासात ६ कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.