उरुळी कांचन, (पुणे) : शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना स्नेहसंमेलनातून वाव मिळत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव शांताराम पोमण यांनी केले.
अष्टापूर (ता. हवेली) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शांताराम पोमण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोमण बोलत होते.
यावेळी सरपंच अश्विनी कोतवाल, उपसरपंच सोमनाथ कोतवाल, श्रीहरी कोतवाल, राजेश कोतवाल, रामदास कोतवाल, नितीन मेमाणे, सुभाष कोतवाल, रमेश करभारी, विजय कोतवाल, योगेश जगताप, शामराव वारे, विलास जगताप, मनोज कोतवाल, दिनेश कोतवाल, अदिनाथ जगताप, दिवाकर पिंगळे, केतन निकाळजे, सचिन थोरात, पालक आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना पोमण म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पूर्व हवेलीतील हे विद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना चालना देण्याचे प्रयत्न विद्यालयात केले जातात. याचाच भाग म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.”
पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. पारंपारिक लोकगीत, कोळीगीत, राष्ट्रभक्तीपर गीत, चित्रपट गीत या गीतावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केले. विद्यार्थ्यांच्या या कला पाहण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आष्टापूर व परिसरातील ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विद्यालयाच्या गुणात्मक वाढीसाठी व विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी उपस्थितांनी विद्यालयास आर्थिक मदत केली. यावेळी संमेलनाच्या आयोजनासाठी शाळा समिती व सल्लागार समिती सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी घोगरे यांनी सर्व नागरिकांचे स्वागत करून विद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली.